मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यात १९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध | पुढारी

मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यात १९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील मध्य गोदावरी उपखोऱ्यात १९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध करून देण्यात आल्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

मध्य गोदावरी उपखोऱ्यात १९ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याची घोषणा झाल्याने मराठवाड्यासाठी ही एक खूशखबर असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

यात त्यांनी १९ टीएमसी पाण्यामुळे बीड, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात नवीन सिंचन प्रकल्प होतील. तसेच पाणी मंजुरीच्या संचिकेवर आपण कालच सही केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

धुळे मनपात सत्ताधारी भाजप नगरसेवकाकडूनच भ्रष्टाचाराचा आरोप !

दरम्यान, हे पाणी अडवून नवे प्रकल्प झाल्यास सुमारे ८० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते असेही जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button