शाहरुख आज आयपीएल फायनल बघायला जाणार की नाही? - पुढारी

शाहरुख आज आयपीएल फायनल बघायला जाणार की नाही?

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान सध्या नाराज आहे. आर्यन खानला ड्रग्जच्या प्रकरणात अटक झाल्यापासून शाहरुख आयपीएलपासून दूर आहे. शाहरुख नेहमी कोलकाता टीमला चीअर करत असल्याचा दिसतो. सूत्रांच्या माहितीनूसार शाहरुख नेहमी कोलकाताच्या टीमच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतो. जर मॉर्गनने आज संघासाठी ट्रॉफी जिंकली, तर किंग खानसाठी ही आनंदाची बातमी असेल.

फ्रँचायसीच्या एका सूत्राने सांगितले की, खरोखरच दु: खद आहे की शाहरुख खान संघाला चीअर करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार नाही, असं काही नसतं तर तो दुबईला आला असता, पण तो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. त्याने खेळाडूंशी अंतर राखले आहे.

आज शाहरुखसाठी खेळणार नाईट रायडर्स

ते पुढे म्हणाले की, हा स्पष्टपणे योग्य निर्णय होता. क्रीडाप्रेमींसाठी दूर राहणे अवघड आहे, पण एक ट्विट देखील त्यांना प्रसिद्धीपासून दूर नेऊ शकते आणि खेळाडू सोशल मीडियावर जे चालले आहे त्यापासून त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. खेळाडू त्यांच्या निर्णयाला महत्त्व देतात. कोलकाता नाईट रायडर्स शाहरुखचा सन्मान करण्यासाठी आज रात्री खेळपट्टीवर प्रयत्न करतील.

CSK विरुध्द होणार सामना

स्पर्धेचा अंतिम सामना आज दुबईच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. सीएसके चौथ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरेल, तर कोलकाताची नजर तिसऱ्या आयपीएल ट्रॉफीवर असेल.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला २ ऑक्टोबर रोजी ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आर्यनला अजुनही जामीन मंजुर झालेला नाही. त्यामुळे शाहरुख खान नाराज असल्याच बोलल जात आहे. त्यामुळे शाहरुखने कोणत्याच सामन्यांना हजेरी लावलेली नाही.

हेही वाचलत का?

Back to top button