चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “बाबरी पाडताना…” | पुढारी

चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, "बाबरी पाडताना..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येत बाबरी पाडताना कोणताही पक्ष नव्हता सर्व रामभक्त होते. त्यावेळी बाळासाहेबांनी परखड भूमिका घेतली होती, हे सर्वांना माहित आहे. चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो आहे. बाळासाहेबांच्या बद्दल त्यांची भूमिका स्पष्ट आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर दिली. बाळासाहेबांचं अयोध्येत राम मंदिर उभारण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. नैतिकता गमावणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीकाही या वेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्‍या नुकसानीची पाहणी करण्‍यासाठी  नगर दौर्‍यावर होते.  यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. आमची श्रद्धा रामाशी आहे, तशीच शेतकऱ्याच्या घामाशी देखील आहे. अयोध्येतून आल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आलो आहे. श्रीरामचरणी बळीराजाच्या सुखाचीच मागणी केली. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसान झालेल्या कुणालाही वंचित ठेवणार नाही. शेतकऱ्यांच्या भावनांशी विरोधकांनी खेळू नये”

त्यांनी दुसऱ्यांना काय शिकवावं…

चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबाबत बोलताना ते म्हणाले की, ज्यावेळी अयोध्येत घटना घडली, तेव्हा बाळासाहेबांनी ‘माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे’ हे उद्गार काढले ते जगजाहीर आहेत. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हा नारा बाळासाहेबांनी दिला. बाळासाहेबांनी मुंबईचं रक्षण केलं. बाळासाहेबांनी नेहमीच सडेतोड भूमिका घेतली, आता जे बोलतात त्यांना काय अधिकार आहे. ते सावरकरांचा अपमान सहन करतात. जे अपमान करतात त्यांच्या सोबत फिरतात. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला त्यांच्या सोबत गळाभेट करतात. त्यांनी दुसऱ्यांना काय शिकवावं आमची भूमिका स्पष्ट आहे. बाळासाहेबांचं अयोध्येत राम मंदिर करण्याच स्वप्न पूर्ण झालं. नैतिकता गमावणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली.

हेही वाचा :

Back to top button