मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वनकुटेत पाहणी दौरा | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वनकुटेत पाहणी दौरा

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसामुळे पारनेर तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचा गुरुवारी (दि.11) वनकुटे येथे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. थेट बांधावर जाऊन शेतकर्‍यांशी चर्चा ते चर्चा करणार आहेत. त्यांच्या समवेत खासदार डॉ. सुजय विखे असणार आहेत.

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार असून, मुख्यमंत्री 11 वाजता वनकुटे (ता. पारनेर) येथे हेलिकॉप्टरने येणार आहेत. यानंतर ते वनकुटे येथील शेतीपिके व नुकसानग्रस्त भागांचा पहाणी दौरा करणार आहेत. यामध्ये हिरामण बन्सी बर्डे, साहेबराव बाचकर यांचे घर पडझड पाहणी करणार आहेत. रामभाऊ काळे, कारभारी पायमोडे, बबन काळे यांची मिरची, डाळिंब, कांदा, कांदा गोट, भुईमूग, संत्री व आंबा फळबाग नुकसानीची पाहणीनंतर वनकुटे येथे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची ते चर्चा करणार असून, त्यानंतर 12.10 वाजता तुळजापूरकडे रवाना होणार आहेत.

Back to top button