लातूर : पेट्रोल पंपाचे लायसन्स देतो म्हणून व्यापाऱ्याला घातला ६१ लाखांचा गंडा | पुढारी

लातूर : पेट्रोल पंपाचे लायसन्स देतो म्हणून व्यापाऱ्याला घातला ६१ लाखांचा गंडा

औराद शहाजानी (लातूर); पुढारी वृतसेवा : पेट्रोल पंपाचे लायसन्स देतो म्हणून येथील एका व्यापाऱ्याला तब्बल ६१ लाख १७ हजार ५०० रुपयाचा गंडा घातला आहे. या प्रकरणी दोघांवर औराद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष अग्रवाल व रवी भल्ला अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत.

औराद शहाजानी येथील व्यापारी अमोल व्यंकटराव सौदागर (वय ४७), यांनी फ्रॉड ऑनलाइन लिंकद्वारे पेट्रोल पंप मिळण्यासाठीचा फॉर्म भरला. त्या माहितीच्या आधारे आरोपी मनीष अग्रवाल व रवी भल्ला यांनी तुम्हाला पेट्रोल डिझेल व सीएनजी पंपाची डीलरशीप मंजूर करतो म्हणून ३ जानेवारी ते ३ एप्रिल २०२३ या कालावधित सौदागर यांच्याशी संपर्क साधला. त्यासाठी वेळोवेळी या दोघांनी सौदागर यांना बँक अकाउंटवर, गुगल पे व आरटीजीएसद्वारे पैसे पाठविण्यास सांगितले‌. सौदागर यांनी ६१ लाख १७ हजार ५०० रुपये पाठवले. त्यानंतर आरोपींनी सौदागर यांच्या व्हाट्सअपवर पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंप मंजूर झाल्याचे खोटे प्रमाणपत्र पाठवले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे सौदागर यांना लक्षात आले व त्यांनी आरौद पोलिसांत फिर्याद दिली. पुढील तपास देवणीचे पोलीस निरीक्षक सोंडारे करीत आहेत.

अधिक वाचा :

Back to top button