जळगाव : मुक्ताईनगर येथे वीज कोसळून ९ शेळ्या ठार; गुराखी थोडक्यात बचावला | पुढारी

जळगाव : मुक्ताईनगर येथे वीज कोसळून ९ शेळ्या ठार; गुराखी थोडक्यात बचावला

जळगाव; पुढारी ऑनलाईन : मुक्ताईनगर तालुक्यात शुक्रवारी (दि.७) संध्याकाळी विजांच्या कडकडाट अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड येथे वीज कोसळून ९ शेळ्या ठार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सुदैवाने यात गुराखी थोडक्यात बचावला आहे.

रामगड येथील पशुपालक अतुल बिलाले स्वत:च्या शेळ्यासह इतरांच्या शेळ्या चारण्यासाठी वस्ती जवळच्या पाझर तलावा लगत गेला होता. सायंकाळी साडे-चार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. दरम्यान घरी परतीच्या वाटेवर असलेल्या शेळ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळून नऊ शेळ्या जागीच ठार झाल्या. या घटनेत अतुल यास किरकोळ दुखापत झाली असुन उपचारासाठी मुक्ताईनगर येथे दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेत गुलाबसिंग बिलाले यांच्या ५ शेळ्या, तारासिंग बिलाले यांच्या ३ आणि लटु बिलाले यांची १ अशा एकूण ९ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. प्रशासनाकडून घटनास्थळी पंचनाम्यासह इतर सोपस्कार पार पाडण्याची प्रक्रिया सुरु आहे. उचंदे येथील पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत लोढे यांनी घटनास्थळाकडे तातडीने धाव घेत मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले.

अधिक वाचा :

Back to top button