विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; अमरावती, अकोला, नागपुरात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट

विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; अमरावती, अकोला, नागपुरात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट
Published on
Updated on

नागपूर; पुढारी ऑनलाईन : अखेर हवामान विभागाचा इशारा खरा ठरवित अवकाळी पावसाने पुन्हा एकदा नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना शुक्रवारी (दि.७) दुपारी आणि सायंकाळी वादळी तडाखा दिला. नागपूरसह अमरावती, अकोला व अन्य जिल्ह्यांतील भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारी अडीचच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट मळभ दाटून आले. पाहता पाहता वादळ वाऱ्यासह पावासाने तडाखा दिला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. तर विजांच्या कडकडाटासह सरी बरसल्या. अचानक पडलेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळही उडाली होती. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढविली आहे. शेतातील बराचसे काढणी केलेले पीक काढण्यात आले तरी काहींचे शेतमाल शेतातच आहे. त्याशिवाय भाजीपाला, फळबागा आणि उन्हाळी धानाला या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे उन-पावसाचा खेळ सुरु आहे. शुक्रवारी सकाळीसुद्धा कडक ऊन पडले होते. अचानक दुपारी सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. सुटीचा दिवस असल्याने बहुतेक जण घरीच होते. तर घराबाहेर पडण्याच्या तयारीत असणाऱ्यांनी निसर्गाचा मुड लक्षात घेऊन घराबाहेर जाण्याचा बेत ऐनवेळी रद्द केला.

सायंकाळ पर्यंत अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू होता. दरम्यान, हवामान खात्याने किमान आठवडाभर म्हणजे १३ एप्रिलपर्यंत विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विजा व गडगडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली आहे. यातच शुक्रवार दुपारी झालेल्या पावसाने वातावरणात उन्हाची तीव्रता थोडी कमी केली आहे. तर, पुढचे दोन दिवस म्हणजे ७ व ८ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी किरकोळ पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news