जालना: टेलरींगच्या दुकानाला आग; २ लाखांची रोकड जळून खाक | पुढारी

जालना: टेलरींगच्या दुकानाला आग; २ लाखांची रोकड जळून खाक

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : टेलरींगच्या दुकानासह घराला लागलेल्या भीषण आगीत तब्बल ४ लाखांचे नुकसान झाले. ही घटना अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे आज दुपारी (दि.१२) चारच्या दरम्यान घडली. या आगीत दुकानांतील सुमारे १ लाख ९३ हजारांच्या रोकडसह सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे ४ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील रामेश्वर सोलनकर यांचे टेलरींगचे दुकान व घर एकत्र आहे. आज दुपारी ४ च्या दरम्यान दुकान व घरात कोणी नव्हते. यावेळी दुकानातून धूर निघत असल्याचे शेजारी राहणारे कुंभकर्ण यांनी बघितले. त्यांनी इतर शेजाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांनी पाणी मारून आग विझवण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला.

या आगीत तीन शिलाई मशीन, शिवायला आलेले कपडे, शिवलेले ड्रेस यासह घरात ठेवलेले १ लाख ९३ हजारांची रोकड, कपडे व इतर साहित्य जळून खाक झाले. अंदाजे ४ लाखांचे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी कारखान्यातील अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले होते. ही आग शॉर्टसर्किटने लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर रामेश्वर सोलनकर यांनी याला महावितरणला जबाबदार धरत नुकसान भरपाईची मागणी महावितरणकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा 

Back to top button