बीड : राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांच्या डॉक्टर लेकीचा पुन्हा पराभव | पुढारी

बीड : राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांच्या डॉक्टर लेकीचा पुन्हा पराभव

केज: पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील सारणी आनंदगाव येथे अतिशय अटीतटीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांच्या डॉक्टर लेकीचा पराभव झाला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या केज नगर पंचायत निवडणुकीत देखील डॉ. हर्षदा बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला होता.

नगर पंचायत मधील पराभव तेव्हा सोनवणे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. आता पुन्हा आपल्या गावातील निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि साखर कारखानदार असलेल्या सोनवणे यांना लेकीला निवडून आणता आले नाही. येथून काँग्रेसचे राहुल सोनवणे यांचे समर्थक संतोष सोनवणे यांची पत्नी प्रणिता संतोष सोनवणे या विजयी झाल्या आहेत. हा निकाल  धक्कादायक मानला जात आहे.

हेही वाचा :  

Back to top button