खोटारडे सरकार, खोटी आकडेवारी देत करतय जनतेची दिशाभूल : नाना पटोले | पुढारी

खोटारडे सरकार, खोटी आकडेवारी देत करतय जनतेची दिशाभूल : नाना पटोले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रातील ‘ईडी’ सरकार हे खोटारडे आहे. आता देखील ग्रामपंचायत, सरपंचपदाच्या निवडणुकीतही खोटी आकडेवारी पुढे करून, ते जनतेची दिशाभूल करत आहेत. दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला तरी, पेढे वाटून आपल्याच घरी मुलगा झाल्याचा आनंद भाजप व्यक्त करत आहे, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि.२०) माध्यमांशी बोलताना केली.

महाविकास आघाडीचे राज्यात सर्वाधिक उमेदवार निवडून आले असून, राज्यात काँग्रेसने ९०० तर नागपूरमध्ये २००च्या वर जागा जिंकल्या असल्याचा दावा पटोले यांनी केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरेतर लाडू वाटण्या अगोदर खरी आकडेवारी जनतेसमोर मांडावी, असे आवाहनही पटोल यांनी केले.

खोटी आकडेवारी देऊन जनतेची फसवणूक करू नये. हे सरकार विधानसभेत, प्रसिद्धी माध्यमांसमोरही खोटे बोलत असल्याचा दावा पटोले यांनी या वेळी केला. एकंदरीत भाजप- काँग्रेसचे दावे प्रतिदावे कायम असून, सायंकाळी सर्व निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

Back to top button