पंढरपूर तालुक्यातील १० ग्रामपंचायतीचा निकाल; ७ ग्रामपंचायती विठ्ठल परिवाराकडे, ३ पांडूरंग परिवाराकडे | पुढारी

पंढरपूर तालुक्यातील १० ग्रामपंचायतीचा निकाल; ७ ग्रामपंचायती विठ्ठल परिवाराकडे, ३ पांडूरंग परिवाराकडे

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीची मतमोजणी मंगळवारी पूर्ण झाली. या निकालाकडे संपूर्ण जिल्‍ह्याचे लक्ष लागले होते. यामध्ये आजोती, नेमतवाडी, खेडभोसे, खरातवाडी, मेंढापूर, टाकळी गुरसाळे, तुंगत या सात ग्रामपंचायतींवर विठ्ठल परिवाराने (राष्ट्रवादी काँग्रेसने) सत्ता काबीज केली आहे. तर व्होळे, बार्डी, पुळूजवाडी या तीन ग्रामपंचायतीवर पांडूरंग परिवार(भाजप)ने सत्ता मिळवली आहे. तर यापूर्वीच सुगाव खुर्द ही ग्रामपंचायत बिनविरोध करत पांडूरंग परिवाराने स्वत:कडे राखली आहे. तर लक्षवेधी ठरलेल्या तुंगत ग्रामपंचायतीवर काँग्रेसने सत्ता मिळवत गड काबीज केला आहे.

या 10 ग्रामपंचायतीसाठी रविवार दि. 18 डिसेंबर रोजी चुरशीने सरासरी 87. 03 टक्के मतदान झाले होते. 28 सरपंच तर 215 सदस्य निवडणुकीत उतरले होते. या दहा ग्रामपंचायतींची मतमोजणी मंगळवार दि.20 रोजी तहसिल कार्यालय पंढरपूर येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांच्या उपस्थित करण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार श्रोत्री व आदीसह कर्मचारी उपस्थित होते. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळून जल्लोष केला जात होता. यावेळी शहर पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

1) मेंढापूर 

सरपंच- विनोद बबन पाटोळे तर सदस्य दिलीप पांडूरंग कोरके, शंकर शिवदास मखर, कमल अभिमान वाघमोडे, राहूल शहाजी साठे, समाधान नागनाथ सुतार, वर्षाराणी नितीन पवार,पुजा अक्षय आयरे, रेखा पंडीत पवार,सुनिता संजय झेंडे, कुसूम सुरेश पाटील,रावसाहेब संभाजी पवार, सुशिला आत्माराम गोरे.

2) बार्डी 

सरपंच-उमेश पंमुलाल खंदारे, तर सदस्य ऐनुदीन मकबूल मुलाणी, अभिजीत दिनकर कवडे, विद्या सटबाजी देवकूळे, अश्विनी शंकर चव्हाण, नंदा आनंदा कवडे, बायडाबाई महादेव भोसले, कल्याण बळीराम कवडे, सुदामती अरुण माळी.

3) पुळूजवाडी 

सरपंच-रेश्मा नानासाहेब होनकळस, तर सदस्य बापू कुंडलिक मदने, विष्णू हनमंत देवकर, मुक्तामाई एकनाथ मदने, संजय विश्वंभर मदने, पार्वती प्रभाकर मदने, पांडूरंग बळीराम यावद, बाळासो शारदा सलगर.

4) टाकळी गुरसाळे 

सरपंच- गिरीजा कुशकुमार वाकसे, तर सदस्य बिभीेषण संदिपान गुटाळ, अरुणा रामचंद्र वाकसे, सुमन माणिक गुटाळ, सुरेश नंदकुमार वाकसे, पुजा गणेश वाकसे, विशाल विलास वाकसे.

5) खरातवाडी 

सरपंच-नागनाथ सुदाम देवकते, सदस्य परमेश्वर शंकर खरात, शोभा बाळू सलगर, भामाबाई बळीराम सावंत, रघुनाथ दत्तात्रय इंगळे, जिजाबाई राजाराम बंडगर, तुषार दादासो खरात, लक्ष्मी भिमराव वगरे.

6) खेडभोसे 

सरपंच- सुरेखा संजय देवळे, सदस्य-सागर दत्तात्रय क्षिरसागर, विकास हनुमंत पवार, शुभांगी अजित साळुंखे, अशोक तुकाराम पवार, जया नागनाथ सुतार, सुमन अर्जून पवार, पांडुरंग दत्तात्रय पवार, पुष्पा मारुती बनसोडे, अश्विनी चंद्रकांत पवार.

7) आजोती 

सरपंच-आरती अभिजीत पवार, सदस्य-सोमनाथ हनुमंत कन्हेरकर, शेवंता भारत मांढरे, पल्लवी धनाजी भोसले, विजय कालीदास आरकिले, नानासो सखाराम व्हटकर, उषा शिवाजी गुटाळ.

8) नेमतवाडी 

सरपंच- स्वाती अभिजीत पाटील, सदस्य-शिवाजी भागवत कोळी, कोमल भारत तुपसौंदर, शोभा भागवत अमराळे, राजकुमार भारत तुपसौंदर, सुरज कैलास खुळे, राजाबाई मारुती गोसावी, दिपक लक्ष्मण खुळे, शोभा गोरख खुळे.

9) तुंगत 

सरपंच- अमृता आबासाहेब रणदिवे, सदस्य- प्रकाश नागनाथ रणदिवे, आशा गुरुनाथ घोडके, शिवानी अमोल रणदिवे, अंगद श्रीरंग रणदिवे, आपसाना रियाज शेख, संगीता शिवाजी इंगळे, बतासराव महादेव वनसाळे, नवनाथ पोपट रणदिवे, अंकल अब्दुलरशिद आतार, कविता रामदास आंद, पंकज अंकुश लामकाने, अलका हनमंत लोहार, कौशल्या नारायण रणदिवे.

10) व्होळे

सरपंच-सुवर्णा युवराज भुसणर, सदस्य-दत्तात्रय राजाराम कोळवले, अश्विनी दर्लिंग मैनाक, अक्षय भारत होळकर, आशा अरुण होटे, अभिमन्यू अंकुश लोंढे, चंद्रकांत लक्ष्मण नायकुडे, सोनाली मनोहर बडके, विठ्ठल अर्जुन भसणर, लक्ष्मी तानाजी लोंढे, लक्ष्मी नागनाथ मदने.

पुळूजवाडीत खा.महाडिकांना धक्का- तर तुंगत मध्ये प्रकाश पाटील यांचे कमबॅक-

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या शेजारील पुळूजवाडी ग्रामपंचायतीवर पांडूरंग परिवार गटाने सत्ता मिळवल्याने खा. धनंजय महाडिक यांना धक्का बसला आहे. तर तुंगत ग्रामपंचायतीची भाजपकडे गेलेली सत्ता काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, कल्याणराव काळे, भगीरथ भालके गटाने पुन्हा सत्ता मिळवली आहे.

Gram Panchayat Election Result 2022 : बाळासाहेबांची शिवसेनेचा परंडा मतदारसंघात पहिला विजय

Jalgaon : पारोळा तालुक्यात ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर फडकला शिंदे गटाचा भगवा

Jalgaon : जामनेर तालुक्यात १२ पैकी १० ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

 

Back to top button