कृषी मंत्र्यांना ओला दुष्काळ म्हणजे काय हेच माहित नाही : आदित्य ठाकरे | पुढारी

कृषी मंत्र्यांना ओला दुष्काळ म्हणजे काय हेच माहित नाही : आदित्य ठाकरे

वडीगोद्री (जालना), पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील गोरी गंधारी येथे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. या दरम्‍यान माध्यमांशी बोलताना ते म्‍हणाले, सद्या सर्वत्र अत्यंत घाणेरडे व गलिच्छ प्रकाराचे राजकारण सुरु आहे. एकीकडे उद्योग आपल्या राज्यातून बाहेरच्या राज्‍यात चालले आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे. मात्र दुदैवाने कृषी मंत्र्यांना ओला दुष्काळ म्हणजे काय हे माहित नाही, असा टोला आदित्य ठाकरे लगावला.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सगळीकडे नुकसान झालेले आहे. ऊस कुठल्याही निकशात बसत नाही. सोयाबीनचे नुकसान झाले आहे. मात्र कुठेही एक पैसा मदत जाहीर झालेले नाही. हे फक्त घोषणांचे सरकार आहे. तसेच त्‍यांनी ईडी सरकारला टोला लगावाला आहे.

कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, जनता त्रस्त असताना दुसऱ्या बाजूला काही सत्ताधारी लोक एकमेकांना शिव्या देण्याचा प्रकार चालू आहे. कुणाला नाव ठेवण टीका टिप्पणी करण म्हणजे एक बालिश पणा दिसतो.

कुठे राज्यकर्ते म्हणून पुढे आले नाही. शासन करणं जमत नाही म्हणून कुठं तरी तुमच-आमच लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत आहे. असे घाणेरडे राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर कधी गेल नव्हते. या दरम्यान युवाशिवसेना कार्यकर्ते यांनी 50 खोके माजले बोके असे म्‍हणत शिंदे सरकारवर जोरदार टिका केली.

हेही वाचा  

संगमनेर: घोषणाबाजी करणार्‍या पाच जणांवर गुन्हे दाखल 

ना.सत्तारांच्या वक्तव्याचा कोपरगावी निषेध, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सत्तारांची प्रतिमा जाळली

महिला उद्योग क्षेत्रात आल्यास देश प्रगतीपथावर जाईल: नारायण राणे

Back to top button