संगमनेर: घोषणाबाजी करणार्‍या पाच जणांवर गुन्हे दाखल | पुढारी

संगमनेर: घोषणाबाजी करणार्‍या पाच जणांवर गुन्हे दाखल

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्या विरोधात घोषणाबाजी करणार्‍या तसेच निषेध व्यक्त करणार्‍या पाच जणांवर संगमनेर शहर पोलिसात जमाव बंदीचा आदेश भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील शिर्डी लोक सभा मतदारसंघाचे नवीन पदाधिकार्‍यां च्या नियुक्ती जाहीर झाल्या होत्या. सदर नियुक्तत्यांवर आक्षेप घेत संगमनेर तालुक्यातील लोकसभा संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या विरोधात रायतेवाडी फाट्यावरील हॉटेल संकेतमध्ये निषेध सभा घेतली होती.

शिर्डी लोकसभेचे संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले आणि आक्षेपार्ह शब्दाचा वापर करत त्यांची बदनामी केली. याप्रकरणी शहर पोलिसांत शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शहर प्रमुख प्रसाद पवार अमोल कवडे, पप्पू कानकाटे, गुलाब भोसले यांच्या विरोधात जमाबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतचा अधिक तपास पो. नि. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात नवीन नियुक्त जाहीर झाल्यानंतर दोन गटांमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळे सध्या संगमनेरात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Back to top button