औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्रामचा इतिहास दैदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्रामचा इतिहास दैदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा मुक्तीसंग्रामचा लढा दैदीप्यमान पर्व होते. आजच्या पिढीला लढ्याची माहिती देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण झाले यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाड्यासाठी विविध विकास कामांची घोषणा केली. औरंगाबाद येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकास गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच मराठवाडा विकास कामांचा सीएम वॉर रूममधून नियमित आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, प्रशांत बंम्ब, उदयसिंह राजपूत, नारायण कुचे आदी उपस्थित होते.

मराठवाड्याची निराशा : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यासाठी फक्त १५ मिनिटे दिली. त्यातही त्यांच्या सर्व घोषणा जुन्याच होत्या. त्यांनी मराठवाड्याची निराशा केली, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. शिंदे सरकारच्या ७५ दिवसांच्या कारभारात उद्योग विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने उद्योगांना दिलेले भूखंड परत घेतले जात असून त्यामुळे अनेक उद्योग राज्याबाहेर जात असल्याची टीका दानेवे यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button