पुणे : आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मी मंत्री नाही: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर | पुढारी

पुणे : आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मी मंत्री नाही: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘सभेतील जल्लोष आणि मतदान यात फरक असतो. हा फरक शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी समजून घेतला पाहिजे. आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मी मंत्री झालो नसून, जनतेची सेवा करण्यासाठी मी मंत्री झालो आहे,’ असे मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यात व्यक्त केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही नेते आपला पूर्ण वेळ देतात आणि आपलं काम करत असतात, असेही त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीच्या सभेत बोलताना शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी केली. त्यांच्यावर अनेक आरोप केले. त्याला प्रत्युत्तर दीपक केसरकरांनी दिले. केसकर म्हणाले, ‘जे नेते विकास करतात ते जल्लोष करत फिरत नाहीत. जनतेच्या भावना भडकवून त्यांच्यावर राज्य करण्याचा एक काळ होता. मात्र आता तो काळ उरला नाही. आता जनतेला त्यांचे हित समजते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही नेते पूर्ण वेळ देतात, आपलं काम करतात. घरात बसून राज्य चालवायचे दिवस गेले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती वेळ मंत्रालयात आले आणि आदित्य किती वेळा आले, हे आपल्याला माहीत आहे.’

Back to top button