परभणी पंचायत समिती गोदामास भीषण आग | पुढारी

परभणी पंचायत समिती गोदामास भीषण आग

परभणी, पुढारी वृत्तसेवा : शहरातील जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोरील पंचायत समितीच्या गोदामांना बुधवारी (दि.४) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्याचे प्रयत्न केले.

परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर असलेल्या बी. रघुनाथ सभागृह नजीक पंचायत समितीचे गोदाम आहेत. गोदामातून बुधवारी रात्री आठच्या सुमारास धूर बाहेर पडत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच शहर वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी अग्नीशमन दलास पाचारण केले व तात्काळ शटर तोडून पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली. दरम्यान, अद्याप या आगीचे कारण कळू शकले नाही.

हेही वाचा  

पुणे : संभाजी भिडे यांना कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी क्लिनचीट 

बीड : पैसे देत नसल्याने आईच्या मदतीने मुलाने केला वडिलांचा खून

चंद्रपूर जिल्ह्यात तीन बड्या अधिकाऱ्यांना तब्बल ५० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Back to top button