प्रल्हाद कांबळे, ज्ञानेश्वर सुनेगावकर सन्मानित | पुढारी

प्रल्हाद कांबळे, ज्ञानेश्वर सुनेगावकर सन्मानित

नांदेड : शहरातील नविन मोंढा मैदान येथे रविवार दि. १७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या भीम महोत्सवात पत्रकार श्रीमंत माने (नागपूर) यांना समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार, कृष्णाई जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार प्रल्हाद कांबळे (नांदेड) यांना तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार ज्ञानेश्वर सुनेगावकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सातारा : गुणरत्न सदावर्ते यांचा पुढील मुक्काम आर्थर जेलमध्ये

डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशनचे संयोजक बापूराव गजभारे यांच्या वतीने रविवार दि.17 रोजी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भीम महोत्सवाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. पंजाबी गायिका गिन्नी माही यांनी पहाडी आवाजात भीम गीते गाऊन आंबेडकरी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जयदीप कवाडे, आमदार बालाजी कल्याणकर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, प्रवीण साले, रमेश सोनाळे, भन्ते पय्या बोधी, श्रीकांत गायकवाड, दत्ता पाटील कोकाटे, पंढरीनाथ बोकारे आदींची उपस्थिती होती.

अखेर नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई होणार !

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी संविधान हीच देशाची ताकद असून संविधानामुळे देश टिकून राहील, त्यामुळे संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे प्रतिपादन केले. तत्पूर्वी प्रास्ताविक भाषणात बापूराव गजभारे यांनी पुढील वर्षापासून प्रज्ञावंत विद्यार्थी असा पुरस्कार देण्याची घोषणा केली. यावेळी ओमप्रकाश पोकर्णा, बालाजी कल्याणकर, प्रवीण साले व ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन पत्रकार राम तरटे यांनी केले.

हेही वाचा

सेन्सेक्स १,१७२ अंकांनी घसरून ५७,१६६ वर बंद, गुंतवणूकदारांना २.३६ लाख कोटींचा फटका

अ‍ॅमवेच्या ७५७ कोटी रुपयांच्या संपत्तीवर ईडीची टाच

लखीमपूर खेरी हिंसाचार : आशिष मिश्राचा जामीन सुप्रीम कोर्टाकडून रद्द

Back to top button