अ‍ॅमवेच्या ७५७ कोटी रुपयांच्या संपत्तीवर ईडीची टाच | पुढारी

अ‍ॅमवेच्या ७५७ कोटी रुपयांच्या संपत्तीवर ईडीची टाच

नवी दिल्ली,पुढारी वृत्‍तसेवा : मल्टिलेव्हल मार्केटिंग (एमएलएम) क्षेत्रातील कंपनी अ‍ॅमवेच्या 757 कोटी रुपयांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. या कंपनीने खुल्या बाजारातील वस्तुंच्या तुलनेत अव्वाच्या सव्वा किंमत लावून अ‍ॅमवेने पैसे जमविले आहेत, असे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

ईडीने जप्त केलेल्या संपत्तीत अ‍ॅमवे इंडिया इंटरप्राईजेस प्रा. लि.च्या तामिळनाडूतील दिंडीगल येथील कारखाने, मशिनरी, वाहने व इतर संपत्तीचा समावेश आहे. तर या संपत्तीची किंमत 411.83 कोटी रुपये इतकी आहे. तसेच 36 बँक खात्यांतील 346 कोटी रुपयांच्या ठेवींवरही ईडीने टाच आणली आहे. अ‍ॅमवेकडून जे मल्टिलेव्हल मार्केंटींग केले जात आहे, तो एक प्रकारचा घोटाळा असल्याचेही ईडीचे म्हणणे आहे.

तसेच, ईडीने केलेल्‍या चौकशीत असा आरोप केली आहे की, अ‍ॅमवे डायरेक्ट सेलिंग मल्टी-लेव्हल मार्केटिंग नेटवर्कच्या नावाखाली पिरॅमिड फसवणूक करत आहे. खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या नामांकित उत्पादकांच्या पर्यायी लोकप्रिय उत्पादनांच्या तुलनेत कंपनीने ऑफर केलेल्या बहुतेक उत्पादनांच्या किंमती कमालीच्या आहेत. असे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button