accident : परभणी : रामेटाकळी शिवारातील अपघातात वारकऱ्याचा मृत्यू | पुढारी

accident : परभणी : रामेटाकळी शिवारातील अपघातात वारकऱ्याचा मृत्यू

मानवत, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील रामेटाकळी ते मंगरूळ या दरम्यान मोटर सायकल व कारच्या अपघातात (accident) एक ठार व दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा येथे अपघात झाला. जीप व मोटरसायकलमध्ये झालेल्या या अपघातात एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. तर १ जण जखमी झाला. रामेटाकळी ते मंगरूळ या दरम्यान रामनगरजवळ मंगळवारी सायंकाळी ५:३० च्या दरम्यान मोटार सायकल व बोलोरो जीपचा अपघात होऊन रामेटाकळी येथील मधुकर रामभाऊ कदम (वय ६० ) यांचा मृत्यू झाला.

जळगाव : लग्‍नाचे आमिष दाखवत विधवा वहिनीवर बलात्‍कार, ७३ लाख रुपयांसह दागिनेही लाटले

याबाबत अधिक माहिती अशी,  महाशिवरात्रीनिमित्त कदम पत्नी ललिताबाई कदम यांना घेऊन मोटरसायकल (एम एच २३ जे २६४६) वरून मुदगल येथे जात होते. त्याच वेळी परभणीहून पाथरीकडे जाणाऱ्या भरधाव बोलेरो जीपने (एम एच २४ व्ही २११६ ) त्यांच्या  मोटारसायकलला उडवले. या अपघातात मधुकर कदम व ललिता कदम गंभीर जखमी झाले. यात मधुकर कदम यांचा मृत्यू झाला .
या घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय करनूर, एएसआय अशोक ताटे, निलेश परसोडे, बिट जमादार उद्धव माने, रामेटाकळी चे पोलीस पाटील प्रदीप गाढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर बोलोरो जीप परभणी येथील महावितरण कार्यालयाची असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात मरण पावलेले मधुकर कदम हे पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाचे प्रमुख म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अपघाती निधनाने रामेटाकळी गावावर शोककळा पसरली आहे .

accident : रामेटाकळी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

परभणी ते मानवतरोड या राष्ट्रीय महामार्ग ६१ चे काम ४ वर्षांपासून खोळंबल्याने या मार्गावरची सर्व वाहतूक पाथरी ते परभणी उमरीफाटा किंवा पोखर्णी मार्गे वळवली असल्यामुळे हा रास्ता वर्दळीचा ठरला आहे. हा रस्ता नुकताच नवीन झाला असल्याने या रस्त्यावर सुसाट वेगात वाहने हाकली जात असल्याने अपघात घडत आहेत. या रस्त्यावर दिशादर्शक फलक, रस्त्यावर दुभाजक पट्टे, गाव तिथे गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे .

हेही वाचलंत का ?

पहा व्हिडिओ 

पिंपरीतील मेट्रोची झलक

Back to top button