जळगाव : लग्‍नाचे आमिष दाखवत विधवा वहिनीवर बलात्‍कार, ७३ लाख रुपयांसह दागिनेही लाटले | पुढारी

जळगाव : लग्‍नाचे आमिष दाखवत विधवा वहिनीवर बलात्‍कार, ७३ लाख रुपयांसह दागिनेही लाटले

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : पाचोरा तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय विधवा महिलेवर दिराने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच ७३ लाख ६४ हजार ५०१ रुपये व सोन्याचे दागिने घेऊन आपली फसवणूक केल्याची तक्रार पीडित महिलेनी केली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्‍वेत परदेशी महिलेचा विनयभंग, तीन वर्षानंतर संशयितास अटक

पाचोरा तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय महिलेच्या आयटी अभियंता असलेल्या पतीचे २०२० मध्ये कोरोनाने निधन झाले. पतीच्या मुत्यूनंतर चुलत दीर आणि सासू-सासर्‍याने फसवणूक करण्याचा कट रचत संगनमताने पीडित महिलेला तिच्या आई-वडिलांकडे गेले.  लग्नाचे आमिष दाखविले. पीडितेने लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवू, अशी भूमिका घेतली. मात्र, त्यानंतरही संशयिताने वेळोवेळी शारीरिक संबंध  ठेवले व लग्नाची विचारणा केल्यानंतर लग्न करण्यास नकार दिला.

पुणे : आक्षेपार्ह पत्रके वाटल्याप्रकरणी मिलिंद एकबोटेंसह 20 जणांवर गुन्हा

संशयित आरोपी तथा चुलत सासरे व दीर अशा तिघांनी मिळून महिलेचा विश्वास संपादन करीत विविध बहाण्याने महिलेच्या पतीच्या खात्यातील ७३ लाख ६४ हजार ५०१ रुपयांची रक्कम वळती करून घेतली. तसेच महिलेच्या मुलीचे ११२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सुद्धा ठेवून घेतले. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  तपास पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

रॅपिड फायर विथ वैदेही परशुरामी

Back to top button