भुईबावडा घाट : दरड कोसळल्याने वाहतूक बंद | पुढारी

भुईबावडा घाट : दरड कोसळल्याने वाहतूक बंद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : संततधार पडणाऱ्या पावसाने भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली आहे.रविवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान गगनबावड्यापासून अंदाजे ४ कि. मी. अंतरावर मोठी दरड कोसळली.

त्यामुळे काही वेळ वाहातूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरु असून दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू झाली आहे.

अधिक वाचा :

तालुक्यात गेले आठ दहा दिवस पावसाची संततधार सुरु आहे.या पावसाने शनिवारी सकाळीही दरड कोसळून वाहातूक विस्कळीत झाली होती.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करुन वाहातूक पूर्ववत सुरु केली होती.

करुळ घाट मार्गाच्या दुरुस्तीसाठी वाहतूक बंद असून सर्व वाहातूक भुईबावडा घाटमार्गातून सुरु आहे. मात्र या घाटातही वारंवार दरडी पडत असल्यामुळे या मार्गावरची वाहातूक केव्हाही बंद पडेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. भुईबावडा घाटमार्गही बंद झाल्यास पश्चिम महाराष्ट्राशी असलेला वैभववाडी तालुक्याचा संपर्क तुटणार आहे.

तोपर्यंत पुन्हा रविवारी सकाळी पुन्हा गगनबावड्यापासून ४ कि.मी.अंतरावर मोठी दरड पडली.या दरडीने पूर्ण मार्ग ठप्प झाला होता. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरड जेसीबीच्या साहाय्याने हटविण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे.सध्या एकेरी वाहातूक सुरु करण्यात आली आहे.

अधिक वाचा :

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.

मुंबईतही मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. चेंबूर विक्रोळी, भांडूप येथील दुर्घटनांमध्ये तब्बल २१ लोकांना जीव गमवावा लागला आहे.

अधिक वाचा :

चेंबूरच्या वाशी नाका येथे असलेल्या भारत नगरमध्ये बीएआरसीची संरक्षक भिंत पाच घरांवर कोसळली. भिंत कोसळल्याने झोपी गेलेल्या तब्बल १७ नागरिकांवर काळाने घाला घातला.

हे ही वाचा :

Back to top button