लंडन ; पुढारी ऑनलाईन : इंग्लंड मधील अनलॉकचा चौथा टप्पा सोमवार, १९ जुलैपासून सुरु होणार आहे. येथे कोरोना प्रतिबंधक नियमावलीमध्ये शिथिलता येणार आहे. मात्र इंग्लंड मध्ये कोरोनाचे नवे रुग्णवाढ आढळत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.
अधिक वाचा
इंग्लंडमध्ये २१ जून २०२१ रोजीच 'फ्रीडम डे'ची घोषणा करण्यात आली होती. मात्र इंग्लंड मध्ये डेल्टा व्हेरियंटमुळे कोरोना संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. यानंतर १९ जुलैपासून अनलॉकचा चौथ्था टप्पा सुरु होईल, असे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी जाहीर केले होते.
५ जुलैपासूनच कोरोना प्रतिबंधक नियमांमध्येच बदल करण्याचे नियोजन होते. मात्र रुग्णसंख्येत वाढ झाल्याने आता १९ जुलैपासून नियमांमध्ये शिथिलता आणण्याचे नियोजन असल्याचे गृहसचिवांनी स्पष्ट केले आहे.
अधिक वाचा
इंलंड मध्ये कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरली. मात्र लसीकरण मोहिम यशस्वी ठरल्याने आता अनलॉक-४ची प्रक्रीया सुरु केली जात आहे.
इंग्लंडमधील ऑनलॉकच्या चौथ्या टप्प्यात सोशल डिस्टसिंगचे नियम शिथिल होतील. सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती असणार नाही. मात्र आपल्या स्वत:च्या जबाबदारीवरच नागरिकांनी विनामास्क फिरावे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
देशात लॉकडाउन पूर्णपणे उठविण्यात आले असेल तरी अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे.
रुग्ण वाढ नयेत म्हणून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी.पुन्हा लॉकडाउनची वेळ येणार नाही, असेच वर्तन हवे, असे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी स्पष्ट केले आहे.
इंग्लंडमध्ये आतापर्यंत ८५ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. सुमारे ३ कोटी ३० लाखांहून अधिक नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
हेही वाचाल का ?