कोरोना: कोल्हापुरात लॉकडाऊन उठणार;या असतील अटी | पुढारी

कोरोना: कोल्हापुरात लॉकडाऊन उठणार;या असतील अटी

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन: जिल्ह्यातील दुकाने सोमवारपासून उघणार असली तरी काही आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. सोमवारी सकाळी ५ ते सायंकाळी ५ पर्यंत जमावबंदी असून रात्री संचारबंदी लागू केली आहे.

सोमवार ते रविवारपर्यंत अत्यावश्यक सेवा व अन्य दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने शनिवार आणि रविवारी बंद राहणार आहेत.

अधिक वाचा :

लैंगिक अत्याचार : मोर्शीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दगडी चाळीच्या भिंतीवर अरुण गवळी चे ‘पदवी’ सर्टिफिकेट!

काय असेल बंद, काय सुरू?

  • हॉटेलमधून सर्व दिवशी केवळ पार्सल सुविधा, होम डिलिव्हरी
  • सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलिंग सर्व दिवशी सकाळी पाच ते ९ पर्यंत
  • मैदानी खेळात गर्दी दिसल्यास पूर्ण निर्बंधाचे अधिकार तहसीलसार आणि आयुक्तांना
  • चित्रीकरण करण्यास स्वतंत्र अलगीकरणाची व्यवस्था असेल, गर्दी न होणारे ठिकाण असेल तर सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत
  • कार्यक्रम, मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक, करमणूक कार्यक्रम बंद राहतील
  • लग्नसमारंभासाठी जास्तीत जास्त २५ लोकांची उपस्थिती
  • अंत्ययात्रा, अंतविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांची उपस्थिती
  • स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सभा, बैठका, निवडणूका सभागृहाच्या ५० टक्के बैठक क्षमतेपर्यंत मर्यादित.
  • बांधकाम सर्व दिवशी सुरू मात्र, ज्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय हवी. मात्र, सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत मुभा
  • व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर्स, स्पा, वेलनेस सेंटर्स सर्व दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेसह
  • व्यायामशाळेत ग्राहकांना वेळ निश्चित करून देणे, एसी सुरु न करण्या अटीवर सुरु राहतील.
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्व दिवशी ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील, उभे राहून प्रवास करता येणार नाही.
  • माल वाहतुकीस जास्तीत जास्त तीन व्यक्ती. यात चालक,मदतनीस,स्वच्छक किंवा इतरांसह) प्रवाशांना
    लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमीत सुरु राहील
  • खासगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहील. स्तर पाचमध्ये समाविष्ठ भागातून प्रवास करीत असल्याच ई पास आवश्यक

हेही वाचले का:

महाविकास आघाडी सरकार : काँग्रेस बाहेर पडल्यास भाजपचा बाहेरून पाठिंबा?

अकोला : हेडफोनवरून वाद मामेभावाने केला आतेबहिणीचा खून

मोदी-पवार भेट : शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले..

भुसावळ : हद्दपार आरोपीनेच मित्राला क्रूरपणे संपविले; आरोपीला अटक

Back to top button