अनिल देशमुख यांच्या काटोल निवासस्थानी ईडीचा छापा | पुढारी

अनिल देशमुख यांच्या काटोल निवासस्थानी ईडीचा छापा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होतच आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी पुन्हा छापेमारी सुरू केली. अधिक वाचा :

या संदर्भात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १८) सकाळीच ईडीचे चार जणांचे एक पथक नागपूरात दाखल झाले. त्यांनी थेट देशमुखांच्या काटोल येथील निवासस्थानी धाड टाकली. काटोल तालुक्यातच वडविहिरा या गावी देशमुख यांचे वडिलोपार्जित निवासस्थान आहे. मात्र, सध्या काटोल येथील निवासस्थानी ईडीने कारवाई सुरू केली आहे. अधिक वाचा :

त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापुर्वीही ईडीने आणि सीबीआईने त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापेमारी केली होती. काही दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त करून नेले आहे. देशमुख यांच्याशी संबधित असलेल्या नागपुरातील त्यांच्या काही निकटवर्तीयांच्या घरीही ईडीने यापुर्वी धाड टाकून तपासणी केली आहे. अधिक वाचा :

त्यानंतर तीन समन्स बजावल्यावरही अनिल देशमुख हे मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात चौकशी करिता हजर राहिले नाहीत. काटोल येथील निवास्थानी मात्र ईडीने केलेल्या तडकाफडकी छापेमारीमुळे आता नेमकी कोणती नवी माहिती ईडीला मिळाली. याबाबत गुढ कायम आहे. देशमुख हे सध्या नागपुरात नाहीत. तर त्यांच्या काटोल येथील निवासस्थानी सुध्दा देशमुख नाहीत. ईडीच्या सुरू असलेल्या कारवाईमुळे त्यांचा मुक्काम मुंबईत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : आम्ही शब्दवारीचे वारकरी; संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे भाग-17 

Back to top button