आ. राजेश पाटील यांच्या मतदारसंघात तब्बल १५० कोटींची विकासकामे | पुढारी

आ. राजेश पाटील यांच्या मतदारसंघात तब्बल १५० कोटींची विकासकामे

चंदगड : नारायण गडकरी

कोरोनाच्या संकटकाळातही दीडशे कोटींहून अधिक निधी आ. राजेश पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी आणला आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी 149 कोटी 58 लाख 79 हजार 111 रुपये विकासनिधी आणला. कोरोना काळ असूनही केवळ दोनच वर्षांत आ. राजेश पाटील यांनी मतदारसंघात कोट्यवधींची कामे मंजूर करून ती मार्गी लावली आहेत.

चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासाठी 11 लाख 11 हजार 111 लाखांचा निधी दिला. गरीब व गरजू लोकांसाठी शिवभोजन थाळी योजना चंदगड, हलकर्णीमध्ये सुरु केली. वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानभरपाईपोटी 2 कोटी 50 लाख रुपये जिल्ह्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने मिळाले. कोव्हिड प्रतिबंधक उपाययोजनेसाठी 50 लाखांचा निधी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसेच आमदारकीचे एक महिन्याचे वेतन 2 लाख 21 हजार कोव्हिड उपाययोजनेसाठी मुख्यमंत्री सहायत्ता निधीला आ. पाटील यांनी दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त अडकूर व कानूर प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका प्रदान केल्या आहेत. बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये सीमाभागातील रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेला मंजुरी मिळवून दिली. जांबरे मध्यम प्रकल्प बंधारे धरण दुरुस्तीस 1 कोटी 41 लाख 20 हजार, जंगमहट्टी मध्यम प्रकल्पाकरिता 1 कोटी 45 लाख 50 हजार, फाटकवाडी, पिळणी, हिंडगाव मध्यम प्रकल्पास 3 कोटी 37 लाख 95 हजार तसेच पाटबंधारे कामांसाठी गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांना 4 कोटी 50 लाख, उचंगी प्रकल्पग्रस्त पुनर्वसनासाठी 10 कोटी, घटप्रभा सांडवा भिंत दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपये, आरोग्य सुविधेकरिता 1 कोटी 80 लाख, गडहिंग्लज ऑक्सिजन प्लांटसाठी 50 लाख, चंदगडसाठी ऑक्सिजन प्लांटला 50 लाख निधी दिला आहे.

विविध विकासकामांसाठी गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांना 4 कोटी 50 लाख, उचंगी प्रकल्पग्रस्त पुनर्वसनासाठी 10 कोटी, घटप्रभा सांडवा भिंतीसाठी 3 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. विस्तीर्ण चंदगड विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे रखडली होती. मात्र, अलीकडच्या दोन वर्षांत ती मार्गी लागल्याचे दिसते. तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हलकर्णी एमआयडीसी येथे 4 एकर जागेत सर्व सोयी असलेल्या सुसज्ज ट्रॉमा केअर सेंटरला शासनाची मंजुरी मिळवण्यात यश आले आहे. शिवाजी विद्यापीठाअंतर्गत व्यावसायिक शिक्षण संकुल कामाला प्रारंभ झाला आहे. याचा लाभ मतदारसंघातील विद्यार्थ्यांसह बेळगाव सीमाभागातील विद्यार्थ्यांना होणार आहे. कोरोना काळ असूनही केवळ दोनच वर्षांत आ. राजेश पाटील यांनी मतदारसंघात कोट्यवधींची कामे मंजूर करून ती मार्गी लावली आहेत.

आजरा, दौलत व गडहिंग्लज साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था येण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यावर भर आहे. तरुणांना रोजगारासाठी तसेच काजू उद्योग व रताळी प्रक्रिया उद्योगासाठी प्रयत्न करणार असून, प्रामुख्याने दुर्गम, डोंगराळ भागात आरोग्याच्या आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार आहे, असेही आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button