DoT Alert : तुमची एक चूक पडेल महागात… दूरसंचार विभागाचा मोबाईल यूजर्सना अलर्ट | पुढारी

DoT Alert : तुमची एक चूक पडेल महागात... दूरसंचार विभागाचा मोबाईल यूजर्सना अलर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क  : “तुमचा मोबाइल नंबर बंद होणार आहे.” अशा स्वरुपाचे कॉल येवून फसवणूक होणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईल धारकांना त्‍यांनी अनावधानाने केलेली एक चूक महागात पडते. त्‍यांची वैयक्तिक माहिती घेवून बॅंक खात्‍यामधून पैसे उकळले जातात. याबाबत दूरसंचार विभागाने मोबाईल यूजर्सना सावधानतेचा इशारा दिला आहे. (DoT Alert)

DoT Alert : मोबाईल धारकांना सावधानतेचा इशारा 

तुम्हीही मोबाईल फाेन वापरत असाल तर दूरसंचार विभागाकडून तुमच्यासाठी एक मोठा इशारा आहे. दूरसंचार विभागाने देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांना अलर्ट जारी केला आहे. अलर्टमध्ये लोकांना फेक कॉल्सबद्दल सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • दूरसंचार विभाग नागरिकांना कधीही नंबर बंद करण्याबाबत कोणत्याही स्वरुपाचा फोन करत नाही.
  • नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती फोन कॉलवर कोणाशीही शेअर करू नये.
  • कृपया करुन तुमच्या टेलिकॉम कंपनीला अशा फेक कॉलची माहिती द्या आणि तक्रार करा.
  • असे कॉल फसवणूक  करणारे असू शकतात आणि फसवणूक करणारे तुमचे बँक खाते फोडू शकतात.
  • तुमच्यासोबत कोणतीही घटना घडल्यास, राष्ट्रीय गुन्हे पोर्टल https://cybercrime.gov.in वर तक्रार करा.
  • तुमचा नंबर बंद होणार आहे असे तुम्हाला सांगितले आणि तो चालू ठेवण्यासाठी OTP सांगितल्यास, फोन ताबडतोब डिस्कनेक्ट करा.

Back to top button