कोल्हापूर : बांबवडेत एसटीवरील सरकारी जाहिरातींना काळे फासून सरकारचा निषेध | पुढारी

कोल्हापूर : बांबवडेत एसटीवरील सरकारी जाहिरातींना काळे फासून सरकारचा निषेध

बांबवडे; पुढारी वृत्तसेवा : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी एसटीवरील सरकारी जाहिरातींसह पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोंना लाल-काळे फासून सरकारचा निषेध नोंदवला.

मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच मराठा आरक्षणाचा लढा आरपारच्या निर्धाराने यशस्वी होण्यासाठी रविवार (ता. २९) सकाळपासून सकल मराठा समाजाने नियोजित बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. विशेषतः कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गावरून धावणाऱ्या एसटीच्या गाड्यांवरील सरकारी जाहिरातींना आंदोलकांनी लक्ष्य करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोंना लाल आणि काळे रंग फासण्याची आक्रमक मोहीम उघडल्याचे दिसले.

अपेक्षेप्रमाणे पक्ष संघटना विरहित या साखळी उपोषणाला परिसरातील सामाजिक संघटना, व्यापारी असोसिएशन यांनी पाठिंबा दर्शविला आहे. बांबवडे पोलीस दुरक्षेत्राच्या शेजारी सकल मराठा समाजाचे तरुण साखळी उपोषणाला बसले आहेत. यावेळी ‘हक्काचे आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही’, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तुषार पाटील, सचिन मुडशिंगकर, विजय लाटकर, दीपक पाटील, रोहित निकम, राहुल निकम, सुरेश म्हाऊटकर, रामभाऊ लाड आदींसह तालुक्यातील मराठा समाजाचे तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

हेही वाचा :

Back to top button