Maratha Reservation : खामुंडीतील ग्रामस्थांचा मनोज जरांगे यांना पाठींबा; राजकीय नेत्यांनाही प्रवेश बंदी | पुढारी

Maratha Reservation : खामुंडीतील ग्रामस्थांचा मनोज जरांगे यांना पाठींबा; राजकीय नेत्यांनाही प्रवेश बंदी

ओतूर(ता.जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : नगर- कल्याण महामार्गालगत असलेल्या खामुंडी  येथील ग्रामस्थांनी श्री काळभैरवनाथ मंदिराचे प्रांगणात एकजुटीने बैठक घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला.  यावेळी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली असून जो पर्यत आरक्षण मिळत नाही तो पर्यत मतदानावर देखील बहिष्कार घालण्याचा ठराव एकमुखाने करण्यात आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र जमा झाले होते तर या ठरावाचे सर्वानुमते निवेदन तयार करण्यात आले असून ते जुन्नरचे तहसीलदार व स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

हेही वाचा

तरुणांनाही बसतोय स्ट्रोकचा झटका; 4 ते 6 टक्के प्रमाण

Bhima River News : भीमानदीपात्रात आढळले दोन पुरुषांचे मृतदेह

मंत्री विखेंच्या हस्ते आज 41 कोटींच्या कामास प्रारंभ

Back to top button