Sahyadri Tiger Reserve : ‘सह्याद्री’त घुमणार वाघांची डरकाळी! पुढील वर्षी अन्य जंगलातून होणार वाघोबांची ‘आयात’ | पुढारी

Sahyadri Tiger Reserve : 'सह्याद्री'त घुमणार वाघांची डरकाळी! पुढील वर्षी अन्य जंगलातून होणार वाघोबांची 'आयात'

पुढारी ऑनलाईन डेस्क : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे पुनर्वसन करण्यास केंद्राच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समिती (एन. टी.सी.ए.) कडून मंजुरी मिळाली आहे. सदर व्याघ्र पुनर्वसन प्रकल्पास राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीकडून १०.५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. (Sahyadri Tiger Reserve)

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यात वाघ पुनर्प्राप्ती धोरण आणि दीर्घकालीन देखरेख (पाच वर्ष २०२२-२०२७) यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समिती कडून 10.50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. (Sahyadri Tiger Reserve)

सदर प्रकल्प दोन टप्यात राबवण्यात येत आहे. यातील पहिला टप्पा नुकताच संपला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये देशातील इतर काही व्याघ्र प्रकल्पून वाघ आणण्यात येणार आहे. साधारणात २०२४ मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये अन्य जंगलातील वाघ आणून सोडले जातील अशी माहिती वाईल्ड लाईफ वार्डन रोहन भाटे यांनी पुढारी ऑनलाईनला दिली. प्रकल्प अध्यक्ष हे महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) असणार आहेत, तर प्रकल्प समन्वयक हे डॉ व्ही.क्लेमेंट बेन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक पश्चिम वन्यजीव विभाग मुंबई हे असणार आहेत. प्रकल्पाचे कार्यकारी हे क्षेत्र संचालक व उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर/कराड असणार आहेत.

प्रकल्पाचे मुख्य अनेवेषक व मुख्य शास्त्रज्ञ के.रमेश भारतीय वन्यजीव संस्था देहराडून व सह-अन्वेषक सह शास्त्रज्ञ डॉ नावेंदू पागे, डॉ प्रशांत महाजन भारतीय वन्यजीव संस्था ढेराडून हे असणार आहेत. तर पाच वर्षासाठी वनविभाग महाराष्ट्र राज्य हे वित्त सहहाय करणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button