कोल्हापूर: हुपरी येथे जालना लाठीचार्जचा मराठा समाजाच्या वतीने निषेध | पुढारी

कोल्हापूर: हुपरी येथे जालना लाठीचार्जचा मराठा समाजाच्या वतीने निषेध

हुपरी, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या घटनेचा हुपरी येथील मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळ्याजवळ जुने एसटी स्टँड येथे मराठा समाज बांधवांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. हाताला काळी पट्टी बांधून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. मराठा समाजाच्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसेच उत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी मराठा समाज अध्यक्ष रविशंकर चिटणीस, मराठा क्रांतीचे विनायक विभुते, सचिन जाधव, पृथ्वीराज गायकवाड, प्रतापसिंह देसाई, नेताजी निकम, माजी उपनगराध्यक्ष गणेश वाईगडे, संजय निकम, अजित उगळे, शिवसेना शहरप्रमुख अमोल देशपांडे, सुरेश इंग्रोळे, राष्ट्रवादीचे बाहुबली गाठ, सात्तापा गायकवाड, रणजित वाईगडे, सुनिल गाट,  संभाजी हांडे, तुषार मालवेकर,  सुरज कदम,  प्रतिकराज निंबाळकर, अमर माने, प्रशांत पाटील, नागेश कौंदाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button