कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारे तीन आरोपी गजाआड | पुढारी

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारे तीन आरोपी गजाआड

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा  कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावातल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केलेल्या ३ आरोपीला कुरुंदवाड पोलिसांनी २४ तासाच्या आत गजाआड केले. प्रशांत पांडुरंग शिंदे, स्वरूपानंद दयानंद कांबळे, यल्लापा आप्पासो मोरडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्याची गुप्तता बाळगून २४ तासात आरोपींना जेरबंद केल्याने कुटुंबियासह पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. रविवारी रात्री साडेदहा वाजता सुमारास अल्पवयीन मुलीला प्रशांत शिंदे याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले होते. यांना पळवून लावण्यासाठी स्वरूप कांबळे,यल्लाप्पा मोरडे या दोघांनी शिंदे याला मदत केली. पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमित पाटील,सागर खाडे यांच्या पथकाने मोबाईल कॉल तपासणी करून कराड येथून कांबळे आणि मोरडे या दोघांना तर किणी- वाठार बस स्थानक चौकातील महामार्गावरून अल्पवयीन मुलगी आणि शिंदे या दोघांना सापळा रचून  अटक केली.

हेही वाचंलत का?

Back to top button