‘दैनिक पुढारी’ समाजमनाचा आरसा : गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाने यांचे गौरवोद्गार | पुढारी

'दैनिक पुढारी' समाजमनाचा आरसा : गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाने यांचे गौरवोद्गार

भुदरगड; पुढारी वृत्तेसेवा : वृत्तपत्र समाजाला ज्ञान देण्याचे काम करते. वाचन संस्कृती टिकली पाहिजे, यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत असलेले ‘दैनिक पुढारी’ समाजमनाचा आरसा आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधकारी दीपक मेंगाने यांनी केले. वाघापूर (ता.भुदरगड) येथील विद्या मंदिर शाळेमध्ये आयोजीत वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दैनिक पुढारीचे वृत्तपत्र विक्रेते तानाजी आरडे होते.

यावेळी डॉ.मा.ग.गुरव,अर्जुन दाभोळे, दत्ता आरडे, अरविंद जठार, ग्रामसेवक तानाजी शिंदे, केंद्रप्रमुख विनायक चौगुले, मुख्याध्यापक नंदकुमार पाटील यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत दयानंद मेहत्तर यांनी तर आभार आर.एस.एकल यांनी मानले.

हेही वाचा :

Back to top button