Amul Milk Price | अमूलचे दूध २ रुपयांनी महागले, गुजरात वगळता सर्व राज्यांत दरवाढ लागू | पुढारी

Amul Milk Price | अमूलचे दूध २ रुपयांनी महागले, गुजरात वगळता सर्व राज्यांत दरवाढ लागू

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; अमूलने (Amul Milk Price) गुजरात वगळता सर्व राज्यांमध्ये फूल क्रीम दूध आणि म्हशीच्या दुधाच्या किमतीत प्रति लीटर २ रुपयांची वाढ केली आहे. याबाबतची माहिती गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आरएस सोधी यांनी दिली आहे. सणासुदीच्या काळात अमूलने दरवाढ केल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे. अमूलच्या फूल क्रीम दुधाची किंमत आता प्रति लीटर ६१ रुपयांवरून ६३ रुपये झाली आहे. याआधी ऑगस्टमध्ये अमूलने अमूल गोल्ड, शक्ती आणि ताझा दुधाच्या किमतीत २ रुपये प्रति लिटरने वाढ केली होती. त्याआधी मार्च महिन्यात दुधाचे दर वाढवण्यात आले होते. उत्पादन खर्च वाढल्याने दूध दरवाढ केल्याचे याआधी अमूलकडून सांगण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पशूखाद्याच्या दरात सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमूलने दूध दरवाढ केली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर चाऱ्याचेही नुकसान झाले आहे. सोयाबीनचे दर वाढत आहेत. पशूखाद्य महागल्याने दूधाचे दर वाढवण्यात आले आहेत. (Amul Milk Price)

याआधी अमूल आणि मदर डेअरी पाठोपाठ मुंबईला दूध पुरवठा करणाऱ्या खासगी तबेल्यावाल्यांनीही दुधाच्या दरात ५ रुपयांनी वाढ केली होती. मुंबईला दूध पुरवठा करणाऱ्या अमूल आणि मदर डेअरी या अग्रगण्य डेअऱ्यांनी दुधाच्या दरात ऑगस्टमध्ये प्रतीलिटर २ रुपयांची वाढ केली होती.

मुंबईत दररोज ४५ लाख लिटर दूध विक्री होते. त्यामध्ये ७ लाख लिटर सुट्या दुधाचा समावेश आहे. हे सुटे दूध मुंबईतील आरे कॉलनी तसेच ठाणे, कल्याण, भिवंडी येथून येते. या सुट्या दुधापासून केवळ मलाई बर्फी तयार होते.

हे ही वाचा :

Back to top button