Khidrapur Kopeshwar Temple : कोपेश्वर महादेवाला सूर्यकिरणांचा अभिषेक; दुपारी शून्य सावलीचा अविष्‍कार | पुढारी

Khidrapur Kopeshwar Temple : कोपेश्वर महादेवाला सूर्यकिरणांचा अभिषेक; दुपारी शून्य सावलीचा अविष्‍कार

कुरुंदवाड : जमीर पठाण खिद्रापूर (ता शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिरातील कोपेश्वर महादेवाला Khidrapur Kopeshwar Temple (शिवलिंग) आज (रविवार) सूर्योदयावेळी 6 वाजून 28 मिनिटांनी किरणोत्सव झाला. गाभा-यातील शिवलिंगावर सूर्य किरणांनी अभिषेक केला. हाच सुंदर भौमितिक आणि खगोलीय अविष्कार पर्यटक आणि भाविकांना अनुभवायला मिळाला.

शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर मंदिर Khidrapur Kopeshwar Temple पश्चिम महाराष्‍ट्रातील पर्यटन क्षेत्रातील तसेच धार्मिक पर्यटनामध्येही भाविकांमध्ये महत्त्वाचे पुरातने मंदिर आहे. याची अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहेत. शून्य सावली ही खगोलशास्त्रीय घटना आहे. प्रत्येक वर्षी 2 वेळा ही घटना घडत असते. सूर्य मध्यान्हाच्या स्थितीत येतो, तेव्हा सूर्याची लंबरुप किरणे पडतात. तो दिवस 5 मे रोजी घडत असतो. किरणोत्सवाचा अनुभव पर्यटक आणि भक्तांनी घेतला. गावातील भजनी मंडळांनी किरणोत्सव अभिषेका दरम्यान भजन म्हणत आनंद साजरा केला.

यावेळी इतिहास अभ्यासक शशांक चोथे, श्रीहरी कोळी, सरपंच कुलदीप कदम, बसगोंड पाटील, संजय स्वामी, दादा मोकाशी यांच्यासह पर्यटकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा : 

Back to top button