चंदगड : तांबूळवाडीत घरावर वीज कोसळून लाखो रुपयांचे नुकसान | पुढारी

चंदगड : तांबूळवाडीत घरावर वीज कोसळून लाखो रुपयांचे नुकसान

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : गुरुवार (दि. १३) रोजी सायंकाळी कारवे, तांबूळवाडी परिसरात विजांच्या कडकडाटासह ढगफूटी सदृश पाऊस झाला. दरम्यान, पाऊस सुरू असताना तांबुळवाडी येथील मिलके यांच्या घरावर वीज कोसळून प्रापंचिक साहित्याची होळी झाली. यामध्ये मिलके कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस सुरू झाल्याने मिलके कुटुंबातील सर्व सदस्य शेतातून घरी येत असतानाच त्यांच्या घरावर वीज कोसळली. यावेळी ८० वर्षांची वृध्द महिला घरी होत्या. अचानक कानठळ्या बसणारा आवाज झाला. आणि संपुर्ण घर धुराने भरले. स्वयंपाक घरातील साहित्याची राख रांगोळी झाली. विजेचा दणक्याने किचन कट्टा कोसळून खड्डा पडला होता. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडी, तसेच संपूर्ण वायर जळाले. मिलके कुटुंब शेतातून घरी आल्यानंतर त्यांना हा घडलेला प्रकार दिसला. तहसील विभागाच्या आपत्ती पथकाकडून रात्री उशिरापर्यंत नुकसान पंचनामा सुरू होता.

हेही वाचा;

Back to top button