आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन स्पर्धेत संजना कोकणेला दोन सुवर्ण | पुढारी

आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन स्पर्धेत संजना कोकणेला दोन सुवर्ण

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील संजना विजय कोकणे (सध्या मुंबईत राहते) हिने नुकतेच भारताचे प्रतिनिधित्व करताना आंतरराष्ट्रीय आमंत्रित कराटे चॅम्पियन स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धा दुबई बुडोकान कप २०२४ केंट कॉलेज स्पोर्ट्स हॉल नाद अल शेबा दुबई (UAE) येथे पार पडल्या.

या स्पर्धेत जगातील १६ देश सहभागी झाले होते. ज्यामध्ये दुबई, भारत, कजाकिस्तान, चीन, जपान, फिलिपिन्स, ओमान, कुवेत, सौदी अरेबिया, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, इंडोनेशिया, भूतान, युके व ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश होता. या स्पर्धेत १६ देशातील एकूण ८२८ कराटे स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये संजना कोकणे हिने दोन सुवर्णपदक पटकावून भारताचे नाव उंचाविले. संजना ही सध्या विद्या निधी इंग्लिश मीडियम स्कूल मुंबई येथे इयत्ता नववी मध्ये शिकत आहे. त्यांचे मूळ गाव दत्तवाड हे आहे.

Back to top button