कोल्हापूर : भारतवीरच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ सजीव देखाव्याचा टीझर दिव्यांगांच्या हस्ते प्रदर्शित | पुढारी

कोल्हापूर : भारतवीरच्या 'सुख म्हणजे नक्की काय असते' सजीव देखाव्याचा टीझर दिव्यांगांच्या हस्ते प्रदर्शित

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक, पौराणिक व समाज प्रबोधनपर सजीव देखाव्यांची पंढरी असलेल्या कसबा बावड्यात यावर्षी सजीव देखाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.  येथील भारतवीर मित्रमंडळाकडून समाजातील उपेक्षित घटक व दिव्यांग व्यक्तींना समर्पित ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ हा सजीव देखावा साजरा करण्यात येणार आहे. या देखाव्याचा टीझर रविवारी दिव्यांगांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. २१ दिव्यांगांसह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ कलाकारांचा समावेश असलेला हा सजीव देखावा ५ सप्टेंबरपासून सायंकाळी ७ वाजता सुरू करण्यात येणार आहे.

दिव्यांग नसलेल्या गोष्टीची खंत न मानता समाजात आनंदात जगत आहेत. पण आपल्याकडे सर्व असूनही आजची तरुणाई छोट्या छोट्या गोष्टीतून नकारात्मक दिशेने पावले टाकत आहे. पालक, समाज, मित्र यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली समाज काय म्हणेल, या विचाराने झगडताना दिसत आहे. त्याला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांच्या जीवनात परिवर्तन होऊ शकते. दिव्यांगांकडे बघून त्यांच्यात निश्चित बदल होऊ शकतो. या थीमवर आधारित हा देखावा सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती दिग्दर्शक मानसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेस मंडळाचे अध्यक्ष दीपक भोसले, उपाध्यक्ष अनिकेत जाधव, सचिव राहुल भोसले, खजानिस अमित जाधव, सुनील पोवार, शरद पाटील, सचिन चौगले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button