अमुदान स्फोट प्रकरण : धोकादायक कंपन्यांचा वीज, पाणीपुरवठा बंद

अमुदान स्फोट प्रकरण : धोकादायक कंपन्यांचा वीज, पाणीपुरवठा बंद

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : अमुदान केमिकल कंपनीच्या स्फोटानंतर सरकारने डोंबिवली एमआयडीसीमधील धोकादायक केमिकल कंपन्यांचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करून त्यांना पाताळगंगा एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या धोकादायक कंपन्यांचा वीजपुरवठा व पाणीपुरवठा सोमवारी (दि.३) बंद करण्यात आला.

अमुदान केमिकल कंपनीच्या स्फोटात १२ लोकांचा मृत्यू झाला तर ६८ जण जखमी झाले होते. ज्या कंपन्यांना एमपीसीबीने नुकत्याच बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यांचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. प्रदूषण मंडळाने सुरक्षा नियमांचे आदेश आणि प्रदूषण मंडळाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या केमिकल कंपन्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तपासणी दरम्यान २५ कंपन्या निकषांचे पालन करत नसल्याचे आढळले. त्यामुळे या कंपन्यांना बंद करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. बंदच्या नोटिसा बजावल्यानंतर पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रशासनाच्या निर्णयामुळे उद्योजकांची निराशा

प्रशासनाच्या या निर्णयामुळे नाराज असलेल्या उद्योजकांची निराशा झाली आहे. कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजू बैलूर म्हणाले, आम्ही एमआयडीसी आणि एमपीसीबीला या कंपन्यांचा पाणी आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्याची विनंती केली आहे कारण कंपनीचा पाणी आणि वीज पुरवठा खंडीत झाल्यास, बंद कंपनीची देखभाल करण्यासाठी तेथे कोणतेही सुरक्षा रक्षक काम करणार नाहीत. ज्यामुळे कंपनीमध्ये असलेल्या रसायने किंवा इतर गोष्टींमुळे अपघात होऊ शकतात, असेही बैलूर म्हणाले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news