भंडारा : मोहघाटा महामार्गावर कंटेनरला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू

मोहघाटा महामार्गावर झालेल्या अपघातात चालकाचा जळून मृत्यू
मोहघाटा महामार्गावर झालेल्या अपघातात चालकाचा जळून मृत्यू
Published on
Updated on

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्गावरील सराटी फाटा येथे उड्डाणपुलावर भरधाव ट्रकने कंटेनरला धडक दिल्याने कंटेनरला आग लागून चालकाचा जागीच मृत्यू झाला. बृजलाल यादव (वय ५३, रा. उत्तर प्रदेश) असे मृत वाहन चालकाचे नाव आहे.

मोहघाटा परिसरात महामार्गावर बांधकाम करण्यास सुरु आहे. त्यामुळे महामार्गावर एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. सोमवारी (दि.3) दुपारी चार वाजताच्या सुमारास सीएनजीवर चालणारा कंटेनर क्रमांक (एमएच ४० सीएम ७३९७) हा भंडाराकडे जात होता. सराटी फाटा येथील उड्डाणपुलावर विरूद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या कांद्याच्या ट्रकने (एमएच १८ एए ६३९३) कंटेनरला जोरदार धडक दिली. या धडकेत सीएनजीवर चालणाऱ्या ट्रकने आग पकडली आणि गॅसचा भडका उडला.

काही क्षणातच कंटेनरने मोठी आग पकडली. या अपघातात कंटेनरला आग आगल्याने चालकाला केबिनबाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. त्यामुळे तिथेच त्याचा जळून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांनी घटनास्थळाला भेट दिली. विरुद्ध दिशेतून ट्रक घेवून येणारा ट्रकचालक मनोहर गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news