आग्रा येथे शिवकालीन युद्धकलेचा कोल्हापुरी मर्दानी खेळाचा थरार | पुढारी

आग्रा येथे शिवकालीन युद्धकलेचा कोल्हापुरी मर्दानी खेळाचा थरार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: आग्रा येथील लाल किल्ल्यासमोर शिवकालीन युद्धकलेचा कोल्हापुरी मर्दानी खेळाचा थरार पाहायला मिळाला. गरुड झेप मोहिम ही आग्रा ते राजगड शिवकालीन मर्दानी खेळ युद्धकलेचा प्रसार होण्याचा एकच ध्यास असल्याचे मत संयोजकांनी मांडले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मर्द मराठी मावळ्यांची परंपरा म्हणजेच मर्दानी खेळ. शिवकालीन युद्धकला ही शिवकालीन युद्धकला भारतातील मराठी बांधव व युवक-युवतींना आजच्या युवा पिढीला माहिती व्हावी.

तसेच ही युद्धकला या लोकांनी अवगत करावी या उद्देशाने शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच अध्यक्ष व हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशनचे सदस्य शिलेदार सुरज ढोली यांच्यासोबत वडगाव मावळचे शिलेदार गणेश जाधव, अंकेश ढोरे, विनायक धारवटकर आणि चैतन्य बोडके (पुणे) हे शिवकालीन युद्धकला प्रसार व प्रचार करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

आग्रा येथे प्रात्यक्षिके करून दाखविली

आग्रा लालकिल्ला व छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर आज बुधवारी (दि. १८) रोजी लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी आणि भाला याची प्रात्यक्षिके करून मोहिमेची सुरुवात केली आहे.

यावेळी आग्राचे आमदार योगेंद्र उपाध्याय महापौर व स्थानिक मराठी बांधव गरूडझेप मोहिम प्रमुख मारुती आंबा गोळे, शामराव ढोरे, नितीन चव्हाण, राजाभाऊ कुलकर्णी, हनुमंत जाभुळकर, विशाल शिंदे, अतुल ढोरे व महाराष्ट्रातील शिवभक्त उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

पाहा : विद्यार्थ्यांनी CA होण्याचे स्वप्न बाळगावे : C.A डॉ. दिलीप सातभाई

Back to top button