Nanded, Ramtirth
Nanded, Ramtirth

Lok Sabha Election 2024 |नांदेड: रामतीर्थ येथे तरुणाने ईव्हीएम मशीन फोडली

रामतीर्थ, पुढारी वृत्तसेवा : बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका मतदान केंद्रात आज (दि.२६)  एका तरुणाने कुऱ्हाडीच्या तुंब्याने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेतले आहे. भैय्यासाहेब येडके असे त्याचे नाव आहे. Lok Sabha Election 2024

नांदेड लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरळीत सुरुवात झाली. सर्व मतदान केंद्रावर मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद असताना दुसरीकडे बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका मतदान केंद्रावर आज दुपारी ३ वाजून ५६ मिनिटांला भैय्यासाहेब येडके हा मतदान करण्यासाठी गेला. यावेळी त्याने सर्व सोपस्कार पूर्ण केले. मतदानासाठी ईव्हीएम समोर गेल्यावर येडकेने आपल्या पॅन्टच्या खिशातील कुऱ्हाडीच्या तुंब्याने ईव्हीएमवर घाव घातला. Lok Sabha Election 2024

मशिन फुटल्याचा आवाज होताच केंद्रातील निवडणूक अधिकारी आणि एजंट यांनी येडके याला शॉक लागला की काय असे वाटले. त्याच्या हातातील कुऱ्हाड पाहताच सर्वच जण घाबरून केंद्राबाहेर आले. केंद्रावरील पोलीस कर्मचा-यांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. त्यानंतर याठिकाणी नवीन मशिन बसवून पुढील प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली.

दरम्यान, या केंद्रावर एकूण मतदान ३७९ पैकी १८५ इतके झाले होते. कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडली तरी, आतमधील डाटावर कोणताही परिणाम झाला नाही. तो व्यवस्थित आहे, असे केंद्रावरील अधिका-यांनी सांगितले. याप्रकरणी कोणताही उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या ठिकाणी मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news