

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सराफा बाजारात सोने (Gold Rate Today) आणि चांदी दरात घसरण झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत आज बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव (Gold Rate Today) १३५ रुपयांनी स्वस्त होऊन प्रति ग्रँम ४७,४४८ रुपये झाला. तर चांदी दरातही प्रति किलोमागे २७९ रुपयांची घसरण झाली.
सोन्याचा दर आता उतरत असला तरी दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव ५० हजारापर्यंत जाण्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,४४८ रुपये (प्रति १० गँम) एवढा होता. तर २३ कॅरेट सोन्याचा भाव ४७,२५८ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,४६२ आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ३५,५८६ रुपये एवढा होता.
चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,६५७ रुपयांवर आला आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात २७९ रुपयांची घसरण झाली.
देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी वाढती आहे. यामुळे दिवाळीपर्यंत दर वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिकी डॉलरच्या मुल्यात घसरण झाल्याने सोने दराला झळाळी मिळत आहे. पण गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. यामुळे भारत आणि चीन सारख्या देशांतून सोन्याला मागणी वाढली आहे.
सोने आणि चांदी दरात गेल्या आठवड्यात घसरण झाली होती. सोन्याचा दर ९५० रुपयांनी घसरला होता. तर चांदी तब्बल ४,१०० रुपयांनी स्वस्त झाली होती.