ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचे पुन्हा काम बंद आंदोलन | पुढारी

ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचे पुन्हा काम बंद आंदोलन

ठाणे; पुढारी वृत्तसेवा: ठाणे महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलन आज सकाळपासून सुरु केले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेच्या वतीने पुन्हा एकदा कामावरून काढून टाकण्याच्या नोटीसा दिल्या आहेत.

सुमारे ५०० पेक्षा अधिक डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कोव्हिड रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी काही मागम्या करत आज बुधवारी (दि. १८) रोजी सकाळपासून काम बंद आंदोलनाला सुरूवात केली. प्रशासनाकडून मात्र, अद्याप कोव्हिड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी कोणतीच चर्चा करण्यात आलेली नाही.

प्रशासनाकडून अचानकपणे कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना न देता कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा देण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर थोड्याच वेळात ग्लोबल रुग्णालयात येणार असून ते या सर्व कर्मचाऱ्यांची भेट घेणार आहेत. प्रवीण दरेकर हे यावर लवकरच तोडगा काढतील असे मत ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टर्स यांचे म्हणणे आहे.

कोव्हिडची लाट ओसरत असल्याने या काम बंद आंदोलनाचा फारसा परिणाम जाणवत नसला तरी, भविष्यात तिसरी लाट आल्यास याच कर्मचाऱ्यांची मदत लागणार असल्याने आमच्यावर हा अन्याय असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा : संशोधनाची सुरुवात शाळेतूनच व्हायला हवी : इनोव्हेशन ऑफिसर हर्षद ठाकूर

Back to top button