देवमाणूस : व्हायरल व्हिडिओमध्ये डॉक्टरसोबत ‘ती’ तरुणी कोण? | पुढारी

देवमाणूस : व्हायरल व्हिडिओमध्ये डॉक्टरसोबत 'ती' तरुणी कोण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : देवमाणूस या झी मराठीवरील मालिकेत आपण पाहिलं की, डॉक्टर अजितकुमार देवने अनेकांना कशाप्रकारे गंडा घातला होता. अनेक स्त्रियांना फसवून, आपल्या जाळ्यात ओढून त्यांचा खून केला होता.

अधिक वाचा –

या मालिकेत डॉक्टरची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने साकारली होती. पण, व्हायरल व्हिडिओमध्ये देवमाणूस मालिकेतील डॉक्टर म्हणजेच किरण गायकवाडसोबत ‘ती’ तरुणी कोण आहे? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अधिक वाचा –

असं म्हणण्यामागे कारणही खास आहे. अभिनेता किरण गायकवाडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गायक सनमचे ओ मेरे दिल के चैन या गाण्यावर तो अभिनय करताना दिसत आहे. इतकंच नाही तर त्याच्यासोबत एक तरुणी दिसतेय. ती तरुणी खूप सुंदर आहे. तिच्या चेहऱ्यावरील स्माईल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

ओ मेरे दिल के चैन या गाण्यावर किरण आणि ती तरुणी एकमेकांच्या जवळ आलेले दिसत आहेत. यावरून चाहते किरण गायकवाडला प्रश्न विचारत आहेत की, तुम्ही कपल आहात का? आणखी एका नेटकऱ्याने विचारले आहे की, ‘ती कोण आहे?’

अधिक वाचा –

किरणने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. kiran_gaikwad12 और purva_rajendra_shinde असं युजरनेम लिहितं After long time ❤️❤️ अशी हार्ट इमोजी पोस्ट केली आहे.

kiran gaikwad
किरण गायकवाड

‘त्या’ तरुणीचं नाव आहे –

या व्हिडिओमध्ये असणारी तरुणी ही पुर्वा राजेंद्र शिंदे आहे. पुर्वाच्या इन्स्टाग्रामवरदेखील हाचं व्हिडिओ पाहायला मिळतो. पुर्वा ही टीव्ही अभिनेत्री आहे. तिने झी मराठीवरील लागीर झालं जी या मालिकेत जयडी (नवी जयडी) ची भूमिका साकारली होती.

याशिवाय तिने युवा डांसिंग क्वीन, टोटल हुबलाक, चला हवा येऊ द्या(लेडीज झिंदाबाद), तुझं माझं जमतंय, घेतला वसा टाकू नको या कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे.

kiran gaikwad
किरण गायकवाड

किरण गायकवाडचे शेवटचे व्हिडिओ व्हायरल 

ही मालिका संपताना अखेरीस किरण गायकवाडने चाहत्यांसाठी व्हिडिओ शेअर केले होते.

एका व्हिडिओमध्ये तो मेहफील मे तेरी हम ना रहे जो गाण्यावर सर्वांना अविदा म्हणताना दिसत आहे. (mehfil me teri hum naa rahe jo). तर दुसऱ्या व्हिडिओत त्यावेळी किरण म्हणतो की, हा देवमाणसाचा अंत असा आहे. जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेन, तेव्हा महाएपिसोडचा भाग टेलिकास्ट झालेला असेल. विचार केला नव्हता कधी असं काही तरी होई. असा सीन करावा लागेल. खूप त्रास होतोय. नांदी होते. पडदा उघडतो.

रंगमंचावर वावर होतो. प्रेक्षकांचं प्रेम, टाळ्या मिळतात. आणि भरतवाक्य झाल्यानंतर जसं प्रेक्षकालय जसं रित होतं ना! तसं पोटात कालवा होतोय. शब्द नाहीत माझ्याकडे. असंचं माझ्यावर प्रेम करा. देव माणसावर प्रेम केलंय. पुन्हा भेटू भन्नाट घेऊन.

हेदेखील वाचलंत का? –

Back to top button