

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलीस आयुक्तालय : पोलीस आयुक्तालयाच्या दारात पेटवून घेत जळत्या व्यक्तीने आयुक्तालयात धाव घेतली. ही घटना आज दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली.
जखमी व्यक्तीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चारित्र्य पडताळणीच्या कारणातून संबंधित व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
नागरीसुविधा केंद्राजवळ संबंधित व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले. आणि त्यानंतर थेट आयुक्तालयात धाव घेतली. प्रसंगावधान राखत तेथील व्यक्तींनी आग विझवली.
जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. दरम्यान व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.
हे ही वाचलं का?
https://youtu.be/0C9F33TFAhc