कोल्हापूर : मिरजकर तिकटी येथे डिझेल कॅनने घेतला पेट; कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना | पुढारी

कोल्हापूर : मिरजकर तिकटी येथे डिझेल कॅनने घेतला पेट; कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान डिझेलच्या कॅनने पेट घेतला. यामुळे तेथे उभा असणाऱ्या ट्रॅक्टरने पेट घेतला. ही घटना आज (दि.२) सायंकाळी मिरजकर तिकटी परिसरात घडली. पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद कारेकर यांनी प्रसंगावधान दाखवत आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

जनरेटरमध्ये घालण्यासाठी कॅनमधून डिझेल आणले होते. या कॅनचा स्फोट होऊन जवळच असलेल्या ट्रॅक्टरने पेट घेतला. यावेळी तेथे उपस्थित असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद कारेकर यांनी पेटता ट्रॅक्टर बाजूला घेऊन पाणी ओतून आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

VIDEO : जेव्हा बंटी पाटील ‘मै हू डॉन’वर थिरकतात!!

हेही वाचलंत का ? 

Back to top button