Bank Holidays : बातमी आपल्यासाठी ! मे महिन्यात तब्बल १४ दिवस बँका बंद राहणार | पुढारी

Bank Holidays : बातमी आपल्यासाठी ! मे महिन्यात तब्बल १४ दिवस बँका बंद राहणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही बॅंकेच्या कामानिमित्त घरातून बाहेर पडत असाल, तर हे जाणून घ्या की, २ ते ४ मेपर्यंत बॅंकेचे कामकाज बंद असणार आहे. बॅंकांची ही सुट्टी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्यां तारखांना असते. त्यामुळे बॅंकांची काम करताना आपल्या शहरातील बॅंक बंद आहे की, नाही हे तपासा. मे महिन्याच्या सुरुवातीला बॅंक सलग बंद राहत आहे. (Bank Holidays)

बॅंका का बंद राहताहेत? 

२ मे रोजी परशुराम जंयती आहे, त्यामुळे बॅंकाचे कामकाज बंद राहिलेले आहे. त्याचबरोबर उद्या (३ मे) रमजान ईदमुळे देशातील अनेक शहरांमध्ये बॅंका बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर तेलंगणामध्ये ४ मे रोजी बॅंकांचे कामकाज बंद राहणार आहे.

  • २ मे रोजी भगवान परशुराम जंयती
  • ३ मे रोजी रमजान ईद आणि बसवेश्वर जयंती
  • ४ मे रोजी तेलंगणामध्ये ईदनिमित्त बॅंक बंद राहणार आहे

पुढेही १० दिवसांची सुट्टी आहे

  • ८ मे रोजी रविवारची सुट्टी
  • ९ मे रोजी गुरु रविंद्रनाथ जयंती (पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा)
  • १४ मे रोजी महिन्याचा दुसरा रविवार
  • १५ मे रोजी रविवार
  • १६ मे रोजी बुद्ध पोर्णिमा (संपूर्ण देशात बॅंका बंद)
  • २२ मे रोजी रविवार
  • २४ मे रोजी काजी नजरुल इस्लाम जयंती (सिक्कीम)
  • २८ मे रोजी चौथा शनिवार
  • २९ मे रोजी रविवार

तुमच्या राज्यातील बॅंकांची सुट्टी तपासून घ्या

राज्यांनुसार बॅंकांना वेगवेगळ्या तारखांना सुट्टी (Bank Holidays) दिलेली असते. तुम्ही तुमच्या शहरातील बॅंकाच्या सुट्टी तपासू शकता. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियकडून बॅंकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केलेली असते. कारण, ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी ही यादी जाहीर केलेली असते. ही यादी जाणून घेण्यासाठी https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या संकेतस्थळावर जाणून घ्या.

हे वाचलंत का? 

Back to top button