पुणे : जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत वडगाव मावळच्या हर्षदा गरुडला सुवर्णपदक   | पुढारी

पुणे : जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत वडगाव मावळच्या हर्षदा गरुडला सुवर्णपदक  

वडगाव मावळ; पुढारी वृत्तसेवा : ग्रीस येथे सुरु असलेल्या ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत दूबेज गुरुकुलची खेळाडू हर्षदा शरद गरुड हिने ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. तिच्या या कामगिरीमुळे वेटलिफ्टिंगची पंढरी असलेल्या वडगावचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर झळकले आहे.

हर्षदा गरुड ही वडगाव मावळ येथील दुबेज गुरुकुलमध्ये क्रीडा प्रशिक्षक बिहारीलाल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिने सन २०१९ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या आशियाई ज्युनिअर स्पर्धेत कास्य पदक मिळविले होते. हर्षदाने तिची निवड योग्य असल्याचे सिद्ध केल्याबद्दल बिहारीलाल दुबे यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, हर्षदाच्या या यशाचे संपूर्ण मावळ तालुक्यातून विशेष कौतुक होत आहे. हर्षदाचे वडील शरद गरुड वडगाव मावळ नगरपंचायतीमध्ये कार्यरत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button