कोल्हापूर : इचलकरंजीत पाणीपुरवठा ठप्प, महिला रस्त्यावर | पुढारी

कोल्हापूर : इचलकरंजीत पाणीपुरवठा ठप्प, महिला रस्त्यावर

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

कृष्णा योजनेला सांगली पाटबंधारे विभागाने सील ठोकल्यानंतर इचलकरंजी शहरात पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. आठ दिवसांपासून पाणी नाही. त्यातच आजही सकाळी नळाला पाणी न आल्याने संतप्त महिला रिकाम्या घागरींसह रस्त्यावर उतरल्या.

मुख्य मार्गावरील जुन्या नगरपालिका इमारतीसमोर रस्ता अडवून प्रशासनाचा निषेध केला. यावेळी आक्रमक महिलांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पाणी लढा कृती समितीच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी पाणी प्रश्नावर तातडीने बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा-

Back to top button