कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, सत्यजित कदम यांचा अर्ज दाखल

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, सत्यजित कदम यांचा अर्ज दाखल

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. आज बुधवारी सत्यजित कदम यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना भाजपकडून दसरा चौकात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे आणि अन्य भाजप नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृहराज्य मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यावर निशाणा साधला. सत्यजित उर्फ नाना कदम यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी जाताना प्रचंड मोठ्या संख्येने लोक आले आहेत. त्यावरुन स्पष्ट होतं की, भाजप या पोटनिवडणुकीत विजयी होणार आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील वातावरण आता चांगलेच तापू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. छोट्या-छोट्या गटाच्या बैठका होऊ लागल्या आहेत.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आ. चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने त्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. परिणामी, काँग्रेसच्या आमदारांचे निधन झाल्याने हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा म्हणून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आग्रही होते.

पहा व्हिडिओ :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news